पोलीस ठाण्यातच महिला कर्मचाऱ्याची आत्महत्या

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


ठाण्यामध्ये एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने गळफास लावत आत्महत्या केली आहे. पोलीस ठाण्यातच या महिला कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. श्रीनगर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक अनिता व्हावळ (34 वर्षे) यांनी गळफास लावत आत्महत्या केली.
अनिता या विवाहीत होत्या आणि त्यांना दोन मुली आहेत. घरगुती वादातून अनिता यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास अनिता यांचा मृतदेह पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना दिसला होता.