विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाची चौकशी होणार

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

मुंबई : विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाची (Accidental death) आता चौकशी होणार आहे. विनायक मेटे यांच्या गाडीच्या चालकाची चौकशी होणार आहे. एकनाथ कदम असं या चालकाचं नाव आहे.
विनायक मेटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी चालक एकनाथ कदम याची चौकशी केली जाणार आहे. एकनाथ कदम याची वैद्यकीय तपासणी होणार आहे.

दुर्घटनेत सुदैवाने चालक, पोलीस कर्मचारी तसेच गाडीतील इतर सहकारी बचावले आहेत. त्यांना दुखापती झाल्या आहेत, त्यामुळे सध्या रुग्णालयात दाखलही करण्यात आले आहे.