ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

वसंतदादा पाटील यांची नात मधू प्रकाश पाटील यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन


माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील (Vasant Dada Patil)यांची नात मधू प्रकाश पाटील (Madhu Prakash Patil) यांचं काल रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं.
मधू पाटील यांच्या अचानक जाण्यानं त्यांच्या परिवारासह कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे. वयाच्या अवघ्या 44 वर्षी त्यांचं निधन झालं.मधू पाटील या काँग्रेसचे खासदार स्व. प्रकाश पाटील आणि काँग्रेसच्या नेत्या शैलजा पाटील यांच्या कन्या तर माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील (Pratik Patil), काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष (Maharashtra Congress) विशाल पाटील (Vishal Patil)यांच्या भगिनी होत्या. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी एक वाजता पद्माळे येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. रात्री आठच्या सुमारास पुणे येथे त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला. त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. मात्र त्यांचे उपचार सुरू असताना निधन झाले.

लहानपणी त्यांच्यावर इंग्लंडमध्ये दोन वेळा हृदय शस्त्रक्रिया
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची त्या नात होत्या. घरातील पहिली मुलगी म्हणून वसंत दादांचा त्यांच्यावर जीव होता. त्यांना प्रेमाने चिमुताई म्हणून ओळखले जात होते. लहानपणी त्यांच्यावर इंग्लंडमध्ये दोन वेळा हृदय शस्त्रक्रिया झाल्या होत्या. त्यानंतर आणखी एकदा त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तरीही त्यांनी जिद्दीने वैद्यकीय शिक्षण घेतले आणि जनतेच्या सेवेत स्वतःला झोकून दिले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button