अभियंता पतीकडून छळ,डॉक्टर तरुणीची आत्महत्या

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


 

डॉ. वर्षा आणि अभियंता धनंजय वसंत डोंगरे (रा. सावरगाव पोखरी, ता. गेवराई, जि. बीड, ह.मु.सरोदे कॉलनी, हमालवाडा, रेल्वेस्टेशन) या दोघांचे तीन वर्षांपासून एकमेकांवर जिवापाड प्रेम होते.

औरंगाबाद : ‘तो’ व्यवसायाने अभियंता तर ‘ती’ डॉक्टर. दोघांचे एकमेकांवर जिवापाड प्रेम. प्रेमाच्या आणाभाका घेत दोघांनी आंतरजातीय विवाह केला. मात्र, अभियंता पतीकडून छळ सुरू झाला.

अखेर छळाला कंटाळून डॉक्टर तरुणीने पाच दिवसांपूर्वी रक्तवाहिनीत इन्शुलिनचे इंजेक्शन टोचून घेतले होते, तिला बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र मंगळवारी (ता.९) तिचा उपचारादरम्यान अखेर मृत्यू झाला.

याप्रकारादरम्यान डॉक्टरच्या खोलीत पोलिसांना पाच पानांची एक सुसाइड नोट सापडली आहे. या प्रकरणी पतीसह, सासू-सासरा, दीर यांच्या विरोधात सातारा पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. डॉ. वर्षा अंबादास व्यवहारे (वय २५) असे मृत डॉक्टरचे नाव आहे.