प्रेयसिनं प्रियकराची गळा चिरुन केली हत्या

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


सध्या लिव्ह इन रिलेशनशिप चं तरुणाईमध्ये भलतच फॅड आहे.
पण या लिव्ह इनमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून याच रिलेशनशिपमुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. लिव्ह इनमध्ये राहण्याऐवजी आपण लग्न करुया असा प्रेयसीचा अट्टाहास होता. पण प्रियकराला ते मान्स नव्हतं, याच वादातून प्रेयसिनं प्रियकराची गळा चिरुन हत्या केली आहे. गाझियाबादमधील या धक्कादायक प्रकारनं संपूर्ण परिसरात भितीचं वातावरण पसरलं आहे.

गाझियाबादमधील हा धक्कादायक प्रकार. लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेमिकेनं आपल्या प्रियकराची गळा चिरुन हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह लपवण्यासाठी तिनं एक मोठी ट्रॉली बॅग घेतली. त्यामध्ये प्रियकर फोरज (23) मृतदेह भरुन त्याची विल्हेवाट लावण्यासाठी ती जात होती. त्यावेळी पोलिसांनी तिला रंगेहाथ पकडलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रेयसी प्रिती शर्मा आपल्या पतीपासून चार वर्षांपूर्वी विभक्त झाली होती. त्यानंतर ती आपला प्रियकर फिरोज (23) सोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. आम्ही रविवारी रात्री टीला मोडजवळ गस्तीवर होतो. त्यावेळी आम्ही तिला ट्रॉली बॅग घेऊन जाताना पाहिलं. महिला कॉन्स्टेबलनं जेव्हा तिची झडती घेतली, त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. बॅगमध्ये तिचा प्रियकर फिरोजचा मृतदेह होता.

प्रितीला तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतलं. तिनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, “तिला प्रियकर फिरोजसोबत विवाह करायचा होता. तिन वारंवार आपण लग्न करुयात, असा तगादा फिरोजच्या मागे लावला होता. पण फिरोज मात्र तिला सातत्यानं नकार देत होता. तो म्हणायचा की, आझे आई-वडील मान्य करणार नाहीत. कारण आपण एका धर्माचे नाहीत. मला याच गोष्टीचा राग येत होता. तो एवढ्यावरच थांबायचा नाही, तर जेव्हा जेव्हा मी त्याच्याकडे लग्नाचा विषय काढायचे, तेव्हा तेव्हा तो तिला कॅरेक्टर लेस म्हणायचा.” याचा रागातून तिनं त्याची हत्या केल्याचं पोलीस चौकशीत कबूल केलं.

गाझियाबादमधील हे पहिलं प्रकरण नाही. एका महिलेनं शेजाऱ्यांच्या बोलण्यात येऊन आपल्याच पोटच्या मुलीचा जीव घेतला. शेजारी सातत्यानं तिच्या मुलीची तक्रार करायचे, त्यामुळे महिला फारच त्रस्त होती. ही घटना उत्तर प्रदेशातील आहे. नफीसानं रात्री 10 वाजता आपली मुलगी अमरिनचा उशीनं तोंड दाबून खून केला. त्यानंतर तिनं स्वतः पोलिसांना फोन करुन यासंदर्भात माहिती दिली आणि फरार झाली.