क्राईमताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

महिलने गाडीवर लिफ्ट घेतली,नवऱ्यानं महिलेला झाडाला बांधून बेदम मारल


पती पत्नीचे नाते हे विश्वासाचे असते परंतु काही अविचारी पुरुष आपल्या पत्नीवर विनाकारण संशय घेतात आणि त्या संशयावरून पत्नीला मारहाण देखील करतात.
राजस्थानमध्ये देखील अशीच एक घटना घडली आहे. बांसवाडा जिल्ह्यात माणुसकीला लाजवेल अशी घटना समोर आली आहे.



एका महिलने वाटेत मित्राकडून गाडीवर लिफ्ट घेतली. हे महिलेच्या नवऱ्याला समजल्यावर त्याचे डोके फिरले. यानंतर नवऱ्यानं महिलेला झाडाला बांधून बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी 2 अल्पवयीन आहेत. या आरोपी नराधम पतीने आपल्या पत्नीला झाडाला बांधून जबर मारहाण केलीय. इतकी क्रूर शिक्षा करण्याचे कारण अगदी किरकोळ आहे.

सदर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना याची माहिती मिळाली. पोलीस अधीक्षकांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. रात्री सुमारे दोनच्या सुमारास पती-पत्नीला शोधून काढण्यात आले. पीडित महिलेने रात्री एफआयआर दाखल केली. पोलिसांनी माहिती घेतल्यानंतर त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button