श्री क्षेत्र मोहटादेवी देवस्थानचे पुजारी व कर्मचारी यांचा चारचाकीच्या धडकेत जागीच मृत्यू

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

श्री क्षेत्र मोहटादेवी संस्थानचे (Shri Kshetra Mohtadevi Sansthan) दोन कर्मचारी (Worker) मोहटादेवी गडावरून पाथर्डीकडे (Pathardi) येत असताना चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत (Accident) दोघांचा जागीच मृत्यू (Death) झाला आहे. हा अपघात (Accident) हंडाळवाडी शिवारातील वृध्देश्वर तालुका सहकारी दुधसंघा जवळ झाला

पाथर्डी : श्री क्षेत्र मोहटादेवी देवस्थानचे पुजारी विवेक उर्फ राजुदेवा भानुदास मुळे व कैलास बाबासाहेब शिंदे हे कर्मचारी मोहटादेवी गडावरून पाथर्डीकडे येत असताना चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.हा अपघात रविवारी पाच वाजण्याचा सुमारास हंडाळवाडी शिवारातील वृध्देश्वर तालुका सहकारी दुधसंघाजवळ झाला.
याबाबत समजलेली प्राथमिक माहिती अशी की,सदरील दोन्ही कर्मचारी आपले काम संपल्यानंतर पाथर्डीकडे येत असताना सांयकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दूधडेअरी जवळ समोरून आलेल्या चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला.हा अपघात एवढा भयंकर होता की एका कर्मचाऱ्याचे शीर धडावेगळे झाले.घटनेनंतर दोघांना पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.यावेळी देवस्थान समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, भीमराव खाडे यांच्यासह आदी कर्मचारी उपस्थित होते.या घटनेने मोठी हळहळ व्यक्ती केली जात आहे.देवस्थान समितीच्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठी शोककळा परसली