बीडच्या अविनाश साबळे यानं कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये नवा करिष्मा करून दाखवला

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

महाराष्ट्राच्या (Maharashtra) अविनाश साबळे (Avinash Sable) यानं बर्मिंगहॅममधल्या (Birmingham) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games 2022) नवा इतिहास घडवला.
त्यानं तीन हजार मीटर्स स्टीपलचेस शर्यतीत नव्या राष्ट्रीय विक्रमासह रौप्यपदकाची कमाई केली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात पुरुषांच्या स्टीपलचेस शर्यतीत भारताचं हे आजवरचं पहिलं पदक ठरलं. या शर्यतीत अविनाश साबळेनं आठ मिनिटं 11.20 सेकंदांची वेळ दिली. त्याचा हा आजवरचा नववा राष्ट्रीय विक्रम ठरला. अविनाशनं रबात डायमंड लीगमधला आठ मिनिटं 12.48 सेकंदांचा स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम आज मोडीत काढला. अविनाश साबळे हा मूळचा बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातला आहे. बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तो भारतीय सेनेत दाखल झाला आहे.

बीड चा (Beed) धावपटू अविनाश साबळे यानं आपली आंतरराष्ट्रीय स्तरावरील चुणूक पुन्हा दाखविली. अमेरिकेतील सन जुआन येथे झालेल्या राउंड रनिंगमध्ये त्यानं तीस वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला होता. बीडच्या अविनाश साबळे यानं कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये रौप्य पदक जिंकून एक नवा करिष्मा करून दाखवला आहे. 3000 मीटर स्टीफलचेस शर्यतीचा अंतिम फेरीत अविनाश साबळे आणि केनियाच्या खेळाडूंमध्ये जोरदार टक्कर झाली. याच खेळाडूंना टफ फाईट देऊन अविनाशनं 8:11:20 सेकंदाची वेळ नोंदवून रौप्यपदक जिंकून नवा इतिहास घडवला आहे. आष्टी सारख्या छोट्याशा गावात जन्माला आलेल्या मांडवा गावच्या तरूणानं सातासमुद्रापलीकडे आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकवला आहे. ही संपूर्ण महाराष्ट्रासाठीच अभिमानाची बाब आहे.