निखळ सौंदऱ्यानं सगळ्यांना वेड लावणारी भारतीय अभिनेत्री म्हणजे जेनेलिया डिसूझा

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


आपल्या हास्यानं आणि निखळ सौंदऱ्यानं सगळ्यांना वेड लावणारी भारतीय अभिनेत्री म्हणजे जेनेलिया डिसूझा. जेनेलिया डिसूझाचा आज वाढदिवस आहे

त्यामुळे सध्या सगळीकडे तिचीच चर्चा होताना दिसतेय. जेनेलियाचा जन्म 5 ऑगस्ट 1987 रोजी मुंबईत झाला असून आज ती तिचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. जेनेलियानं बॉलिवूड, तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम करुन आपल्या अभिनयानंही अनेकांची मनं जिंकली आहेत. अशातच जेनेलियाच्या वाढदिवसानिमित्त तिच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया.

जेनेलिया डिसूझाच्या नावाबाबत एक मनोरंजक किस्सा माहितीये का?. ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. जेनेलिया डिसूझा हे नाव तिच्या आई आणि वडिलांच्या नावावर आहे. जेनेलियाच्या आईचे नाव जेनेट आणि वडिलांचे नाव नील आहे, त्यामुळे तिचे नाव ‘जेनेलिया’ ठेवण्यात आले आहे.

जेनेलियानं 2003 मधे ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केलं. या चित्रपटात जेनेलियासोबत अभिनेता रितेश देशमुखनं मुख्य भूमिका साकरली होती. पहिल्या भेटीत जेनेलियाला रितेश अजिबात आवडला नाही. तिला वाटलं की, हा महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याचा मुलगा आहे तर याच्यात खूप इगो असेल किंवा खूप अॅटिट्यूड असेल.

मात्र, हळूहळू या चित्रपटावेळी दोघेही एकमेकंच्या प्रेमात पडले होते. जवळपास 9 वर्षे डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केलं. जेनेलिया आणि रितेश यांना दोन मुलेही आहेत. त्यांचं नाव रियान देशमुख आणि राहिल देशमुख असं आहे.