प्रसिद्ध गायक आणि अभिनेते किशोर कुमार यांची आज जयंती, दिल धडकाए, सिटी बाजाए, आँख मारे या गाण्यावर तुफान डान्स

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

मुंबई : आपल्या दिलखुलास अंदाजाने ज्यांनी अवघ्या भारताला मोहून टाकलं असे प्रसिद्ध गायक आणि अभिनेते किशोर कुमार (kishore kumar) यांची आज जयंती आहे.

संपूर्ण देशभरात त्यांची जयंती साजरी केली जाते. सध्या त्यांच्या जयंतीनिमित्त्त एक कार्यक्रम आयोजिय करण्यात आला होता. त्यांच्या जन्मस्थानी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाने मोठी खळबळ उडाली आहे.अभिनेते किशोर कुमार (kishore kumar) यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगावी म्हणजे मध्य प्रदेशातील खंडवा इथे गौरव दिवस साजरा केला जातो. तीन दिवसीय गौरव दिवसांतर्गत अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असते. या कार्यक्रमात आयोजित केलेला झुंबा डान्स कार्यक्रमाने सध्या खळबळ माजवली आहे.

किशोर कुमार (kishore kumar) यांच्या जयंतीनिमित्त आयोजित प्रोग्रॅममध्ये दिल धडकाए, सिटी बाजाए, आँख मारे या गाण्यावर जिल्हा पंचायत CEO आणि नगर निगम कमिश्नर सविता प्रधान यांनी तुफान डान्स केला. या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे या महिला अधिकारी सोशल मीडियावर बऱ्याच ट्रोल होत आहेत. या व्हिडिओवर काही लोकांनी थेट मुख्यमंत्र्यांना ट्विट करून कारवाईची मागणी केली आहे.