क्राईमताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात ३ दहशतवाद्यांना अटक

जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात ३ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून सुरक्षादलांनी मोठी कारवाई केली आहे. सुरक्षा यंत्रणांनी हंदवाडा परिसरात एका अल्पवयीन मुलासह तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे.
त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

हंदवाडा येथील फ्रूट मंडी क्रॉसिंगवर संयुक्त ब्लॉक तपासणी मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांनी तीन तरूणांना संशयास्पद स्थितीत पाहिले. तसेच पोलिसांनी चलान कापल्यानंतर तिघांनी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या तिघांनाही अटक करण्यात आल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली आहे.

सुरक्षा दलांनी त्यांच्याकडून एक पिस्तूल, एक पिस्तूल मॅगझिन, ७ गोळ्या आणि दोन हातबॉम्ब जप्त केले. तसेच हंदवाडा येथे दहशतवादी हल्ले करणे, लोकांना जखमी करून या परिसरातील शांतता बिघडवण्यासाठी या तिघांना काम देण्यात आले होते, असं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button