बीड बंदुकीचा धाक दाखवत दरोडेखोरांनी 9 लाख रोख आणि पाच तोळे सोने पळवले

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


बीड तालुक्यातील वडवाडी येथे बळीराजा कृषी विज्ञान मंडळाचे प्रमुख अभिमान अवचर यांचे घर आणि कार्यालय आहे. मध्यरात्री 8 ते 10 दरोडेखोरांनी अवचर यांच्या घरी आणि कार्यालयावर दरोडा टाकला. यावेळी बंदुकीचा धाक दाखवून तब्बल 9 लाख रुपयांच्या रोकडीसह 5 तोळे सोने पळविले. या घटनेने वडवाडीच्या बालाघाट परिसरात एकच खळबळ उडाली.


बीड : बीड जिल्ह्यातून दरोड्याची प्रचंड भयानक घटना समोर आली आहे. बंदुकीचा धाक दाखवत 8 ते 10 दरोडेखोरांनी 9 लाखांची रोख रक्कम आणि पाच तोळे सोने पळवून नेलं आहे.
दरोडेखोरांची एवढी मोठी हिंमत होतेच कशी, त्यांना पोलिसांची भीती राहिलेली नाहीय का? असा प्रश्न या घटनेच्या निमित्ताने उपस्थित केला जातोय. दरोडेखोरांनी चोरी करताना दाम्पत्यास बेदम मारहाण देखील केल्याची माहिती समोर आली आहे. या भयानक आणि धाडसी चोरीच्या घटनेमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

या घटनेतील आरोपी चोर हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. बीडच्या वडवाडी गावात बंदुकीचा धाक दाखवून 8 ते 10 जणांनी सशस्त्र दरोडा टाकलाय. यावेळी दरोडेखोरांनी बळीराजा कृषी विज्ञान मंडळाचे प्रमुख अभिमान अवचर यांचं कार्यालय आणि घरी धाडसी दरोडा टाकून पती-पत्नीला बेदम मारहाण करत 9 लाख रुपये रोख आणि 5 तोळे सोने चोरून नेले आहे. ही घटना काल मध्यरात्रीच्या दरम्यान घडली आहे.