मुलीची छेडछाड का केली? म्हणून जाब विचारताच आईचा चाकूनं वार करून खून

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


अल्पवयीन मुलीची छेडछाड का केली? म्हणून जाब विचारल्यानं बीड च्या (Beed) अंबाजोगाई तालुक्यातील वानटाकळी तांड्यावर एका 32 वर्षीय महिलेचा चाकूनं वार करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी अंबाजोगाईच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील वानटाकळी तांड्यावर राहणाऱ्या अनिता राठोड आणि त्यांचे पती वैजिनाथ राठोड काही दिवसांपूर्वी तिरुपतीला दर्शनासाठी गेले होते. त्यांनी त्यांच्या तीन मुली काळवटी तांडा येथे त्यांच्या नातेवाईकाकडे थांबवल्या होत्या. यावेळी बबन चव्हाण यांनी त्यांच्या एका मुलीची छेडछाड केली आणि तिला त्रास द्यायला सुरुवात केली. अनिता राठोड आणि त्यांचे पती वैजनाथ राठोड हे तिरुपतीहून परत आल्यानंतर घडलेला सर्व प्रकार मुलींनी आपल्या आई वडिलांना सांगितला त्यानंतर अनिता राठोड यांनी बबन चव्हाण याला छेडछाडी बद्दल जाब विचारला त्यामुळे अनिता राठोड आणि बबन चव्हाण यांच्यात भांडण झालं.

अनिता राठोड आणि बबन चव्हाण यांच्यामध्ये वाद सुरू असतानाच हा वाद एवढा विकोपाला गेला की, बबन चव्हाण यां अनिता राठोड यांच्या पोटावर धारदार चाकूने वार केले आणि त्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या त्यांना उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

यासर्व प्रकरनानंतर आरोपींना तात्काळ अटक व्हावी यासाठी अनिता राठोड यांच्या नातेवाईकांनी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये मोठी गर्दी केली होती. ठिय्या आंदोलन सुरू केलं त्यानंतर अंबाजोगाईच्या ग्रामीण पोलिसांनी तीन पथक या आरोपींना पकडण्यासाठी रवाना केली आणि यामध्ये बबन चव्हाण त्यांचे वडील राजाभाऊ चव्हाण या दोघांना आणिता राठोड यांचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.