रिया आवळेकर देशातील पहिल्या तृतीयपंथी शासकीय शिक्षिका होण्याचा मान

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

मुंबई : देशातील पहिल्या तृतीयपंथी शासकीय शिक्षिका होण्याचा मान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिया आवळेकर यांनी मिळवला आहे. परंतु त्यांना या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मोठा खडतर प्रवास करावा लागला आहे.
यासंदर्भातील माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिली आहे.

रिया आवळेकर या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असून त्यांचे अगोदरचे नाव प्रविण असे होते. पण त्यांना इथपर्यंतचा प्रवास खूप खडतरपणे पार करावा लागला आहे. या प्रवासानंतर त्यांनी देशातील पहिल्या तृतीयपंथी शासकीय शिक्षिका होण्याचा मान मिळवला आहे. यानंतर रूपाली चाकणकर यांनी त्यांना याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

“रिया यांच्या संघर्षमय प्रवासात त्यांचे कुटुंब तसेच जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी,आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागाने खूप सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे आभार. व रिया आवळेकर यांच्या हातून येणाऱ्या काळात सक्षम पिढी घडो याच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने शुभेच्छा…” अशा शब्दांत चाकणकरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.