पीएम मोदी म्हणाले, यावेळी ‘मन की बात’ खूप खास,

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशाला संबोधित केले. या या शोचा 91 वा भाग होता. यावेळी पीएम मोदी म्हणाले, यावेळी ‘मन की बात’ खूप खास आहे.

त्याचे कारण म्हणजे यंदाचा स्वातंत्र्यदिन. जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होतील. आपण सर्वजण एका अतिशय अद्भुत आणि ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊ. हे महान भाग्य देवाने आपल्याला दिले आहे. पूढे ते म्हणाले, आझादीच्या अमृत महोत्सवाला जनआंदोलनाचे स्वरूप येत असल्याचे पाहून मला खूप आनंद होत आहे. पंतप्रधान म्हणाले, आझादीच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेचा एक भाग बनून तुम्ही 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान तुमच्या घरावर तिरंगा फडकविण्याचे आवाहन त्यांनी आज पुन्हा केला आहे.

पंतप्रधान म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात (Amrit Mahotsav) होणाऱ्या या सर्व कार्यक्रमांचा सर्वात मोठा संदेश हा आहे की, आपण सर्व देशवासियांनी आपले कर्तव्य पूर्ण निष्ठेने पाळले पाहिजे. तरच आपण त्या अगणित स्वातंत्र्यसैनिकांचे स्वप्न पूर्ण करू शकू. त्यांच्या स्वप्नातील भारत आपण घडवू शकू. म्हणूनच आपला पुढील 25 वर्षांचा हा अमृत काल प्रत्येक देशवासियांसाठी कर्तव्यकाळ आहे. आमच्या शूर सैनिकांनी आम्हाला ही जबाबदारी दिली आहे आणि ती आम्हाला पूर्ण करायची आहे. शहीद उद्यम सिंह यांना आदरांजली वाहताना पंतप्रधान म्हणाले, “आजच्या दिवशी आपण सर्व देशवासी, शहीद उद्यम सिंह यांच्या हौतात्म्याला नमन करतो. देशासाठी बलिदान दिलेल्या इतर सर्व महान क्रांतिकारकांना मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो.