क्राईमताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

प्रेयसीचे दुसऱ्या पुरुषाशी अनैतिक संबंध,प्रियकराने गळा चिरुन केली हत्या


प्रेयसीचे दुसऱ्या पुरुषाशी अनैतिक संबंध असल्याचे कळल्यानंतर संतापलेल्या प्रियकराने तिची गळा चिरुन हत्या केल्याची घटना मालाडमध्ये बुधवारी मध्यरात्री घडली.
मनीषा पृथ्वीपाल जयस्वाल (27) असे मयत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी मयत तरुणीच्या मावसभावाच्या फिर्यादीवरुन कुरार पोलीस (Mumbai Kurar Police) ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास करत 12 तासात आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. अखिलेश कुमार प्यारेलाल गौतम (24) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.प्रेयसी घरी एकटी असताना अखिलेशने तिचा गळा चिरत डोक्यावर वार करत तिची हत्या केली. अखिलेश आणि मनिषाचे प्रेमसंबंध होते आणि दोघे लग्नही करणार होते. मध्यरात्री मनिषाचा मावस भाऊ घरी आल्यानंतर हत्येची घटना उघडकीस आली. कुरार पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद करून मानखुर्द रेल्वे स्थानकावर सापळा रचून आरोपीला अटक केली. बेपत्ता अखिलेशला पकडण्यासाठी पोलिसांच्या टीम शोध मोहिमेवर रवाना झाल्या होता. त्याच्या लोकेशनच्या आधारे पोलिसांचे पथक मानखुर्द परिसरात पाठलाग करत गेले होते, तेव्हा तो मानखुर्द रेल्वे स्टेशनवर असल्याचे आढळला. पोलिसांनी रेल्वे स्थानकावर सापळा रचून अखिलेशला अटक केली.

पोलिसांना फोन कॉलची पडताळणी केल्यानंतर माहिती मिळाली

मिळालेल्या माहितीनुसार मृत मनीषाचे तिच्या मावसभावाशी संबंध असल्याची माहिती अखिलेशला मिळाली होती. त्यामुळं तो चिडला होता. पोलिसांना फोन कॉलची पडताळणी केल्यानंतर ही माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अखिलेश आणि मृत तरुणी आसपासच्या गावात राहायचे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button