आंधळं प्रेम,दोन मुलांची आई 15 वर्षीय मुलासोबत पळून जाते तेव्हा. !

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


प्रेम आंधळं असतं असं बोललं जातं. असाच काहीसा प्रकार आंध्र प्रदेशमधील क्रृष्णा जिल्ह्यात घडला आहे. या जिल्ह्यातील गुडीवाडा गावातील एक 30 वर्षीय महिला आठवीत शिकणाऱ्या 15 वर्षाच्या मुलासोबत पळून गेल्याने खळबळ उडाली आहे.

स्वप्ना असे त्या महिलेचे नाव असून ती दोन मुलांची आई आहे.

स्वप्ना ही विवाहीत असून तिला दोन मुलं आहेत. ती तिच्या पती व मुलांसोबत या गावामध्ये राहायची. याच गावात राहणाऱ्या एका 15 वर्षीय मुलासोबत तिचे सूत जुळले होते. अनेकांनी त्यांना एकत्र पाहिलेही होते. मात्र दोघांच्या वयातील अंतर पाहता व स्वप्ना विवाहीत असल्याने कुणाला तसा संशय आला नाही.

मात्र 19 जुलै रोजी सदर मुलगा बेपत्ता झाल्याचे समोर आले. त्यानंतर गावकऱ्यांनी मुलाची शोधाशोध सुरू केली. त्यावेळी त्यांना स्वप्ना पण बेपत्ता असल्याचे समजले. या प्रकरणी मुलाच्या वडिलांनी स्वप्नविरोधात मुलाला पळवून नेल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिच्या विरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर तब्बल 7 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी राहिल्यानंतर त्या दोघांनाही पकडण्यात आले.