मध्यावधी निवडणुका (Election) होतील अशा चर्चेला उधाण आले असताना उद्या जरी निवडणुका लागल्या तर आम्ही तयार आहोत असे सांगतानाच निवडणुका होणार नसतील तरी राज्य एकंदर कोणत्या परिस्थितीत चाललं आहे त्यावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत.
काही कमतरता आणि चुका असतील त्यासंबंधीची भूमिका त्या-त्या वेळी घेतली जाईल त्यामुळे आम्ही बांधलेली राजकीय बांधणी अजिबात विस्कळीत होणार नाही असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नाशिक येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे धुळे येथे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांनिमित्त नाशिकमार्गे जात आहेत. तत्पूर्वी त्यांनी नाशिकमध्ये (Nashik) छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांच्या भेट घेतली. तसेच आज शरद पवार हे नाशिक मुक्कामी आहेत. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे सरकार टीका करताना म्हणाले की राज्यात सरकार येऊन एक महिना झाला असून अद्यापही राज्याला मंत्री नाहीत. मंत्रिमंडळ विस्ताराला इतका विलंब योग्य नाही. राज्यात पूर परिस्थिती असताना काम करण्यासाठी मंत्रिमंडळ टीम असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षाचे नेते लोक संकटात आहे. तिकडे भेटी देता यातून मुख्यमंत्री यांनी बोध घ्यावा. स्वतःच कार्यक्रम घ्यायचे की शेतकऱ्यांच्या भेटी घ्यायच्या हा विरोधा भास तुम्हीच बघा असे शरद पवार यांनी सांगितले.