चरित्र्याच्या संशयावरून लोखंडी पात्याने पत्नीच्या कानावर वार करून खून

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


चरित्र्याच्या संशयावरून रागाच्या भरात शेतासाठी लागणारे लोखंडी पात्याने पत्नीच्या कानावर वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मारेकरी पती हा फरार झाला आहे. याबाबत चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लीलाबाई ग्यानसिंग बारेला (वय २५, रा.धवली ता.वरला जि.बडवानी, सध्या गोरगावले शिवार, चोपडा) असे मृत महिलेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, लीलाबाई बारेला आणि तिचा पती ग्यानसिंग बारेला हे दोघे चोपडा तालुक्यातील गोरगावले शिवारात राहत होते. पत्नी लीलाबाई यांच्यावर चरित्र्याच्या संशयावरून पती ग्यानसिंग बारेला हा नेहमी मारहाण करत होता. लिलाबाई व टेम्बऱ्या मन्साराम बारेला (वय-२३) रा. धवली ता.वरला जि.बडवाणी ह.मु. गोरगावले शिवार चोपडा) यांच्यात चरित्र्याच्या संशयावरून वाद झाल्याने रागाच्या भरात आरोपी पती ग्यानसिंग बारेला याने शेतात लागणारे लोखंडी कोळपणेची पाते हात घेवून पत्नी लिलाबाईच्या डाव्या कानावर वार केले. यात लिलाबाई गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर पती ग्यानसिंग बारेला हा घटनास्थळाहून पसार झाला