मनीषा रुपेता या पाकिस्तानातीलपहिल्या हिंदू महिला डीएसपी

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


मनिषा सांगते की, पाकिस्तानातील महिला सामान्यतः पोलिस स्टेशन आणि कोर्टात जाण्यास कचरतात. कुटुंबातील पुरुष सदस्यासोबतच त्या या ठिकाणी जातात. चांगल्या घरातील मुली पोलिस ठाण्यात जात नाहीत, असा समज आहे, हा समज मला बदलायचा होता. पोलीस पेशाने मला नेहमीच मोहित केले आणि प्रेरणा दिली. समाजातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी पोलीस महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे मला नेहमीच वाटत होते.

मनीषा रुपेता या पाकिस्तानातील २६ वर्षीय हिंदू महिलेने इतिहास रचला आहे. त्या पाकिस्तानच्या पहिल्या हिंदू महिला डीएसपी बनल्या आहेत. मनीषाने 2019 मध्ये सिंध लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती.
आयोगाने नुकतेच निकाल जाहीर केले, ज्यामध्ये मनीषाने 16 वा क्रमांक मिळवून हा विक्रम केला.

पाकिस्तानातील मागासलेल्या जकूबाबाद जिल्ह्यातील मनीषा रुपेता या हिंदू महिलेने इतिहास रचला आहे. त्या पाकिस्तानच्या पहिल्या हिंदू महिला डीएसपी बनल्या आहेत.

सिंध प्रांतातील जकूबाबाद जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या २६ वर्षीय मनीषा हिने २०१९ मध्ये सिंध लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. आयोगाने नुकतेच निकाल जाहीर केले, ज्यामध्ये मनीषाने 16 वा क्रमांक मिळवून हा विक्रम केला.

रुपेताने जिओ न्यूजला सांगितले की, मला इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप कष्ट करावे लागले, कदाचित मला इतरांपेक्षा जास्त मेहनत करावी लागली असेल. कधी-कधी वाटायचं की दिवस असेच जातील आणि अभ्यासाशिवाय काहीच करता येणार नाही.

रुपेता सांगते की, मला नेहमीच काहीतरी वेगळं करायचं होतं. माझ्या तिन्ही बहिणींनी वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतले आहे. मी देखील MBBS करावं अशी सर्वांची अपेक्षा होती पण परीक्षा पास न झाल्याने मी पोलीस सेवेत रुजू होण्याचा निर्णय घेतला.