धार्मिक

घरात अशा ठिकाणी माचिस ठेवणं अशुभ ! नकारात्मक गोष्टी अचानक वाढत राहतात


नित्य जीवनात आपण करत असलेल्या विविध गोष्टींचा कुटुंबावर परिणाम दिसत असतो जीवनात प्रगती करण्यासाठी फक्त मेहनतच कामी येते असे नाही. काही गोष्टींमध्ये नशिबाची साथ मिळणेही आवश्यक असते.



वास्तुशास्त्रामध्ये आगपेटी (मॅचस्टिक)शी संबंधित काही गोष्टी सांगितल्या आहेत. बरेच लोक आपल्या घरातील देव्हाऱ्यात किंवा पूजागृहात आगपेटी ठेवतात. आगपेटी देव्हाऱ्यात ठेवणं योग्य आहे का? त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर होतो आणि ते कळतही नाही. आज आम्ही तुम्हाला या विषयावर अधिक माहिती देणार आहोत.

देव्हाऱ्यात आगपेटी ठेवणं अयोग्य – वास्तुशास्त्रानुसार, घरातील देव्हाऱ्यात आगपेटी ठेवणे निषिद्ध मानले जाते. असे केल्याने अनेक प्रकारचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. देव्हारा हा आपल्या घरातील सर्वात पवित्र स्थान असते. तिथे कोणतीही ज्वलनशील वस्तू ठेवू नये. आपल्याकडून जाणूनबुजून किंवा नकळत तसे होत असल्यास त्याचे नुकसान सहन करावे लागते.

नकारात्मक शक्ती आकर्षित होऊ लागतात – ज्योतिषांच्या मते पूजाघरात माचिस ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. या अशुभ शक्ती आपल्या सर्व चालू कार्यात अडथळा आणून शुभ कार्यात विलंब लावतात. या नकारात्मक शक्तींमुळे घरात पैशांची कमतरता भासते आणि डोक्यावर कर्जाचे ओझेही वाढते. असे केल्याने केलेल्या उपासनेचे योग्य फळ मिळत नाही.

घरामध्ये या ठिकाणी आगपेटी ठेवावी – वास्तुशास्त्रींच्या मते, घरात माचिस ठेवण्यासाठी बंद जागा किंवा बंद कपाटाचा वापर करावा. असे केल्याने नकारात्मक शक्ती घरापासून दूर राहतात आणि कुटुंबाची प्रगती होते. यामुळे कुटुंबात संपत्तीचा प्रवाह वाढतो आणि मुलांकडून शुभवार्ता प्राप्त होतात.

सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. लोकशाही त्याची हमी देत नाही.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button