क्राईमताज्या बातम्या

लग्नाच्या आमिषाने तरुणीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल


पुणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दशरथ गायकवाड (वय २७, रा. शिवनेरीनगर, बागवान चौक, कोंढवा खुर्द) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे.



या प्रकरणी एका पीडित तरुणीने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड आणि तरुणीची ओळख आहे. त्याने तरुणीला विवाहाचे आमिष दाखवून हांडेवाडी भागातील एका लॉजवर आणि घरी नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तरुणी गरोदर राहिल्यानंतर त्याने तिला धमकावून कॅम्पमधील एका रुग्णालयात नेले. तेथे गर्भपात करण्यात आला.

दुसऱ्यांदा गरोदर राहिल्यानंतर त्याने गोळ्या खाण्यास देवून गर्भपात केला. एप्रिल २०२२ पासून हा प्रकार सुरू होता. तरुणीने लग्नाबाबत विचारले असता त्याने नकार दिला. अखेर तरुणीने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास सहायक निरीक्षक विष्णू देशमुख करीत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button