ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्रराजकीय

भाजप उमेदवारांची पहिली यादी तयार, महाराष्ट्रातून ‘या’ दिग्गज नेत्यांचा पत्ता साफ?


भाजपची लोकसभा उमेदवारांची (Loksabha Candidate 2024) पहिली यादी लवकरच जाहीर होणार आहे. लोकसभेसाठी भाजपची पहिली यादी 1 किंवा 2 मार्चला जाहीर होण्याची शक्यता आहे..



भाजपच्या पहिल्या यादीत मोदींचं नाव असणार आहे. 100 उमेदवारांची घोषणा भाजपच्या पहिल्या यादीतून करण्यात येईल अशी माहिती सुत्रांनी दिलीय.. 29 फेब्रुवारीला भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होतेय, या बैठकीत उमेदवारांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होईल.

महाराष्ट्रातून या नेत्यांचा पत्ता साफ?

पंकजा मुंडे (Pankaja Munde), गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) हे तीनही भाजप नेते लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची चर्चा आहे. आजी-माजी मंत्र्यांना लोकसभेसाठी उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा होती. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचं दिसतंय. भाजपकडून 23 लोकसभांसाठी निवडणूक निरिक्षकांची घोषणा करण्यात आलीय. त्यात पंकजा मुंडेंकडे उत्तर मुंबई, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांकडे उत्तर पूर्व तर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे बीड लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आलीय.

 

त्यामुळे मुंडे, महाजन, मुनगंटीवार लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याच्या चर्चांना जोर आलाय. दरम्यान भाजप निवडणूक निरीक्षकांची गुरुवारी बैठक होणारेय. निरीक्षक स्थानिक खासदारांच्या कामगिरीचा आढावा घेणारेत. स्थानिक खासदारास दोन पर्याय कोण? याचीही चाचपणी करण्यात येणारेय. भाजप सरकारी अधिकाऱ्यांना तिकीट देण्याच्या तयारीत असल्याची प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी दिलीय.

 

पीएम मोदी पुन्हा वाराणसीतून

100 उमेदवारांच्या पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचं नावही असण्याची शक्यता आहे. पीएम मोदी तिसऱ्यांदा वाराणसी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवतील. 2019 मध्ये ज्या जागेवर भाजपला पराभव पत्कारावा लागला होता. त्या जागेसंदर्भात नव्याने विचार केला जाणार आहे.

लोकसभा 2024 : भाजपचं टार्गेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक 2024 साठी 370 जागा जिंकण्याचं टार्गेट ठेवलं आहे. 2024 मध्ये 2019 पेक्षा जास्त जागा मिळतील असा भाजपाला विश्वास आहे. पीएम मोदी यांनी भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला लोकसभेत 400 जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला आहे. जागांबरोबरच व्होट शेअर वाढतील असा पीएम मोदी यांनी भाकित वर्तवलं आहे. 1984 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला होता. काँग्रेसने तब्बल 414 जागा जिंकल्या होत्या. भाजपने हा आकडा मागे टाकत ऐतिहासिक विजय मिळवण्याचं लक्ष्य ठेवलं आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button