ताज्या बातम्या

खुशखबर! कच्चा तेलाचे दर घसरले, पेट्रोल-डिझेलच्या नव्या किंमती जाहीर…


जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढउतार दिसून येत आहे. त्यामुळे भारतीय तेल कंपन्यांवर इंधन दरवाढीचा दबाव येण्याची शक्यता आहे.



दरम्यान, गुरुवारी (२२ फेब्रुवारी) आंतराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरेल ३ ते ४ डॉलर्सनी कमी झाले

कच्च्या तेलाचे दर कमी होताच भारतीय इंधन कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी केले आहेत. बिहार आणि उत्तरप्रदेशात इंधनाच्या किमतीत घसरण झाली आहे. तर नोएडामध्ये पेट्रोल-डिझेल महाग झाले आहेत. महाराष्ट्रात इंधनाच्या दरात कुठलाही बदल करण्यात आला नाही.

मुंबईसह, पुण्यात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. विशेष बाब म्हणजे, गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रात इंधनाच्या किंमतीत कुठलीही वाढ झालेली नाही. त्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळत आहे. येत्या काळात राज्यात पेट्रोल-डिझेल स्वस्त होऊ शकतं, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

  • दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर
  • मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर
  • चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर
  • कोलकातामध्ये पेट्रोल १०६.३१ रुपये. आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर
  • महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा भाव काय?
  • मुंबईमध्ये पेट्रोलचे दर १०६.३१ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर हे ९४.२७ रुपये प्रति लिटर आहेत.
  • पुण्यामध्ये पेट्रोलच्या किंमती १०५.८४ रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किंमती ९२.७१ रुपये प्रति लिटर एवढ्या आहेत.
  • नाशिकमध्ये पेट्रोल १०६.१८ रुपये प्रति लिटरने विक्री होतंय. तर डिझेल ९२.४१ रुपये प्रति लिटर इतकं आहे.
  • नागपुरामध्ये पेट्रोलची किंमत १०६.०४ रुपये आणि डिझेलची किंमत ९२.६३ रुपये प्रति लिटर एवढी आहे.
  • छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल १०७.२१ रुपयांनी विक्री होतंय. तर डिझेल ९३.५७ रुपये प्रति लिटरने मिळतंय.
  • अहमदनगरात पेट्रोलच्या किंमती या १०५.९६ रुपये प्रति लिटर अशा आहेत. डिझेलच्या किंमती ९३.४१ रुपये प्रति लिटर एवढ्या आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button