महत्वाचेमहाराष्ट्रराजकीय

भुजबळांचा थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्यावरच जोरदार हल्ला, साडेतीनशे कोटी रूपये खर्च करून सर्वेक्षण सुरू आहे


मुंबई : एकीकडे तुम्ही म्हणता ओबीसीला धक्का लावत नाही, दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आयोगातर्फे साडेतीनशे कोटी रूपये खर्च करून सर्वेक्षण सुरू आहे.



म्हणजेच काम पुर्ण नाही झालेले नाही. क्युरेटीव्ह पिटीशनचाही निर्णय अद्याप यायचा आहे. मग तुम्ही कुठली शपथ पुर्ण केलीत, असा थेट सवाल विचारत राज्याचे अन्न, नागरी व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chhagan Bhujbal On CM Eknath Shinde) यांच्यावरच जोरदार हल्लाबोल केला आहे. ते एका मराठा वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये बोलत होते.

मी जाहिरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती. ती शपथ आज पुर्ण केली. दिलेला शब्द मी पाळला, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांचे उपोषण सोडवताना आणि मराठा आरक्षणाच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर केले होते. या वक्तव्याचा जोरदार समाचार भुजबळ यांनी घेतला.

छगन भुजबळ म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती की, मी मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या दिवशी ते म्हणाले मी शपथ पुर्ण केली. पण मराठा समाजाला काही आरक्षण दिले नाही.

छगन भुजबळ म्हणाले, तुम्ही फक्त पुढच्या मार्गाने १० ते १५ टक्के आरक्षण देत असल्याचे दाखवत आहात.
पण, खरे आरक्षण तुम्ही दुसऱ्याच मार्गाने दिले. तुम्ही जे आरक्षण दिले आहे, ते कुणबी प्रमाणपत्र देऊन आडमार्गाने दिले.

त्यामुळे मराठा समाजाला वेगळे आरक्षण मिळालेच नाही. मग तुम्ही जे आरक्षण दिले, ते कुठल्या मार्गाने दिले आहे.
मग तुम्ही आरक्षणाचा जो शब्द पुर्ण केला तो मराठा समाजाला ओबीसीतून घुसवून केला.

भुजबळ पुढे म्हणाले, जर तुम्ही शपथ पुर्ण झाली असे म्हणता, तर मग आयोगाचे काम थांबवा, क्युरेटीव्ह पिटीशन मागे घ्या.
मग साडे तीनशे कोटी का खर्च करताय?

भुजबळ म्हणाले, हे उपोषण करून जे मागतात ते द्यायला सुरुवात केली.
निजामशाहीच्या नोंदी, नंतर अख्ख्या मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या आणि आता ओबीसीत टाका.
मग म्हणाले अख्ख्या महाराष्ट्रातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या.

नंतर म्हणाले आरक्षण घेणार तर ओबीसीतूनच घेणार, आता म्हणतात ५७ लाख नोंदी सापडल्या. त्यातले ३० ते ३५ लाख
जुने आहेत, तरी सुद्धा २० ते २२ लाख नोंदी कुठून आल्या, या सगळ्या चुकीच्या नोंदी आहेत, असा आरोप भुजबळ
यांनी केल्याने राज्याच्या मंत्रिमंडळात मराठा आरक्षणावरून जुंपल्याचे दिसत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button