क्राईम

प्रॉपर्टी हडपण्यासाठी पत्नीने रचला कट नवऱ्याला आधी पाजली दारू नंतर केला सर्पदंश


नाशिक : नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. बायकोच नवऱ्याच्या जीवावर उठली आहे, प्रॉपर्टी हडपण्यासाठी पत्नीने साथीदारांच्या मदतीनं कट रचत पतीला मारण्याचा प्रयत्न केला आहे.

नाशिकच्या बोरगड परिसरातून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिअर पाजून पत्नीनं पतीला सर्पदंश करून मारण्याचा प्रयत्न केला. मात्र या घटनेत सुदैवानं पीडित पतीचा जीव वाचला आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बायकोच जीवावर उठल्याची घटना नाशिकमधून समोर आली आहे. नाशिकच्या बोरगड परिसरात ही घटना घडली आहे. पतीनं संपत्ती हडपण्यासाठी पतीच्या हत्येचा कट रचल्याची माहिती समोर येत आहे. पत्नीनं आधी पतीला बिअर पाजली, त्यानंतर त्याला सर्पदंश करून मारण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान तीनं पतीचा गळा देखील आवळला. महिलेनं आपल्या दोन साथिदारांच्या मदतीनं आधी पतीचं तोंड उशिनं दाबलं, नंतर त्याचा गळाही आवळण्यात आला, त्यानंतर त्याला संर्पदंश करण्यात आला.

या सर्वांमधून देखील पती वाचला आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पत्नीन बीअर पाजून संर्पदश केला, तसेच डोक्यात हेल्मेटनेही मारल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी महिला आणि तिच्या दोन अज्ञात साथिदारांवर गुन्हा दाखल केला आहे. सोनी उर्फ एकता जगताप असं या आरोपी महिलेचं नाव आहे, तर विशाल पाटील असं या घटनेतील पीडित पतीचं नाव आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button