औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचं नामांतर धाराशिव हे करण्याचा निर्णय

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


शिंदे-फडणवीस सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कॅबिनेटमध्ये झालेल्या बैठकीत औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचं नामांतर धाराशिव हे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नवी मुंबई येथील विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव दिलं जाणार आहे. आमच्या कॅबिनेटने हा निर्णय घेतला आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. एमएमआरडीएला ६० हजार कोटींचे कर्ज उभारण्यास तत्वतः मान्यता. तसेच पहिल्या टप्प्यात १२ हजार कोटींच्या रकमेस शासन हमी देणार असंही जाहीर करण्यात आलं आहे.

उद्धव ठाकरे यांच्या सरकारने अल्पमतात असताना शेवटच्या दिवशी कॅबिनेट बैठक बोलवली. त्या बैठकीत औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांची नावं बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसंच नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याचाही निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय अवैध असल्याने तो रद्द करून नव्याने या संदर्भातला निर्णय घेतला गेला आहे. पूर्ण बहुमत असलेलं सरकार याबाबतचा निर्णय घेईल हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.