व्हिडिओ न्युज

Video : पाणीपुरी खाताना कपलचं घाणेरडे कृत्य


सोशल मीडियावर एक व्हिडीओ
समोर आला आहे. जो पाणीपुरीशी संबंधीत आहे. या व्हिडीओत कपल असा प्रकार करतात की तो पाहून तुमची पाणीपुरी खाण्याची इच्छाच मरुन जाईल आणि कदाचित या नंतर पाणीपुरी खाणार देखील नाही.

X वर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक जोडपे पाणीपुरी खाण्यासाठी विक्रेत्याकडे गेले. आधी मुलगा पाणीपुरी त्याच्या मैत्रिणीला देण्याऐवजी स्वतः खातो, ज्यानंतर त्याची मैत्रीण आश्चर्य व्यक्त करते. यानंतर ती सुका गोलगप्पा तोंडात ठेवते आणि त्यानंतर तो मुलगा पाणापुरीचे पाणी आधी स्वत: पितो आणि मग आपल्या तोंडातील पाणी त्याच्या मैत्रिणीच्या तोंडात टाकतो. त्याची मैत्रिण देखील हे आवडीने खाते. हे दृश्य पाहून पाणीपुरी विक्रेत्याने तोंड दुसरीकडे वळवले.

काही दिवसांपूर्वीच दिल्ली मेट्रोचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये एक मुलगा आपल्या मैत्रिणीच्या तोंडात एनर्जी ड्रिंक टाकताना दिसत होता. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी संताप व्यक्त करायला सुरुवात केली आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @desimojito नावाच्या पेजने शेअर केला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button