ताज्या बातम्या

शिर्डीहून तुळजापूरला देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या कारचा अपघात, दोघांचा जागीच मृत्यू


शिर्डीमधून तुळजापूरकडे दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारला भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.



अपघातात ठार झालेल्यांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

शिर्डी येथील भाविक हे तुळजापूर (Tuljapur ) या ठिकाणी दर्शनासाठी निघाले होते. यावेळी त्यांची कार बीडच्या आष्टी येथील पोखरी (Beed Accident) गावाजवळ आले असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट झाडावर जाऊन आदळली. या अपघातामध्ये चालक रुपेश बबन भेंडे आणि अनिता राहुल इंगोले या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अभय इंगोले आणि अनुप इंगोले ही दोन मुलं गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची ही घटना घडल्यानंतर स्थानिकांनी अपघातग्रस्तांना तात्काळ मदत केली. या अपघातात जखमी झालेल्या दोन मुलांना जामखेड या ठिकाणी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. या अपघातानंतर शिर्डी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
  • .
Back to top button