व्हिडिओ न्युज

Video दोन बाईकवर चार बंदूकधारी ,महिलेचं धैर्य पाहून बंदूकधारी हल्लेखोर पळाले


हरियाणाच्या भिवनी येथील एका व्हिडिओमुळे खळबळ उडाली आहे. घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून प्रसंग अंगावर काटा आणणारा आहे. व्हिडिओमध्ये दोन बाईकवर चार हल्लेखोर घराबाहेर थांबलेल्या एका व्यक्तीवर गोळीबार करताना दिसत आहेत.



तेवढ्यात व्हिडिओमध्ये एका महिलेची एन्ट्री होते. महिला चारही हल्लेखोरांना पळवून लावत असल्याचं दिसत आहे.

हल्लेखोर हरिकिशन याला संपवण्यासाठी आले होते. हरिकिशन हा रवी बॉक्सर हत्या प्रकरणातील आरोपी आहे. शिवाय त्याचे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईसोबत संबंध असल्याचं सांगितलं जातं. सध्या हरिकिशन जामीनावर बाहेर आहे. तीन महिन्यांपूर्वीच भिवनी पोलिसांनी हरिकिशन याच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना अटक केली होती.

भिवनीतील दाबूर कॉलनीमध्ये सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. हल्लेखोरांनी एकूण नऊ गोळ्या झाडल्या. त्यातील चार गोळ्या हरिकिशनला लागल्या आहेत. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहेत. पोलिस सीसीटीव्ही तपासत असून व्हिडिओतील चारही आरोपींचा शोध सुरु करण्यात आला आहे.

व्हिडिओमध्ये हरिकिशन आपल्या घराबाहेर उभा ठाकल्याचं दिसत आहे. त्यावेळी चार हल्लेखोर दोन बाईकवर त्याच्यासमोर येतात. त्यातील एकजण हरिकिशनवर गोळी चालवतो. हरिकिशन जीव वाचवण्यासाठी घराकडे धाव घेतो. गेटमधून आत जात असताना त्याला गोळ्या लागतात, त्यामुळे तो गुढघ्यावर पडतो. पण, स्वत:ला सावरत तो आत जावून गेट लावून घेतो. हल्लेखोर गेटसमोर येऊन गोळ्या चालवतच असतात.

गोळीबार सुरु असतानाच एका महिलेची एन्ट्री होते. महिलेच्या हातात एक मोठा झाडू दिसत आहे. ती हातात झाडू घेऊन हल्लेखोरांवर चालून जाते. बंदूक बाळगणाऱ्या हल्लेखोरांचा महिला धैर्याने सामना करते. हल्लेखोर महिलेने दाखवलेल्या धैर्यामुळे माघार घेतात. चारही हल्लेघोर बाईकवर बसून निघून जातात. महिला नेमकी कोण आहे हे समजू शकलेलं नाही. पण, महिलेच्या हस्तक्षेपामुळे एकाचा जीव वाचला आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button