व्हिडिओ न्युज

video : एकाच पोरीवर दोघांचा जीव जडलाअन् झाला राडा ! तरूणांची भररस्त्यात तुफान हाणामारी


प्रेम हे आंधळे असते. प्रेमात पडलेला व्यक्ती आपल प्रेम मिळवण्यासाठी कोणत्याही टोकाला जातो. अगदी जीवाची बाजी लावण्यासही पुढे मागे बघत नाही.

अशातच सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन तरूणांमध्ये एका पोरीसाठी जोरदार हाणामारी होत आहे

नेमक काय हे प्रकरण पाहूयात…

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत आपण पाहू शकतो. दोन तरूण चक्क एका तरूणीसाठी भररस्त्यात हाणामारी करत आहेत. ही हाणामारी एवढ्या जोरात होत आहे की, ते तरूण एकामेंकाना लाथा- बुक्क्यांनी मारत आहेत.

या मारामारीत एकाचा शर्टही तसंच डोक्यावरची पगडीही निघून जाते. रस्त्यातवरील इतर लोक त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तेवढ्यात दुसरा तरूणमध्ये येतो अन् त्यांच्यापैकी एकाला मारायला लागतो. परंतू बाकी लोक त्याला अडवतात. मात्र शेवट पर्यंत तरूण मारामारी थांबण्याच नाव घेत नाहीत.

व्हायरल व्हिडिओ हा @gharkekalesh या एक्स अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ चंदीगडमधील आहे. तिथल्या व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये या हाणामारीचा व्हिडिओ कैद केलाय.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button