व्हिडिओ न्युज

Video : महिला जी एका जंगली खारूताईला दररोज खाऊपिऊ घालत होती झाल अस


काही लोक प्राणी पाळत नसले तरी त्यांना खाणंपिणं घालण्याची. मुक्या जीवांसाठी काही आपल्या दरवाजात, खिडकीत, बाल्कनीत, छतावर अन्न-पाणी ठेवतात.



भुकेला, तहानलेला जीव इथं येऊन खाऊन-पिऊन तृप्त होतो. अशीच एक महिला जी एका जंगली खारूताईला दररोज खाऊपिऊ घालत होती. त्याबदल्यात तिला जे मिळालं ते थक्क करणार आहे. खारूताईचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.@TheFigen_ या एक्स अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

 

पाळीव प्राण्यांना खाऊपिऊ घालणारं खूप आहेत पण जे पाळले नाहीत अशा जीवांचा विचार करणारे कमीच. अशाच लोकांपैकी ही महिला. जी एका जंगली खारीला दररोज खायला घालत होती. आता खार जिला काही समजत नाही, तिला काय खायला मिळतं ती खाऊन जाते. असं आपल्याला वाटेल. पण ही खा मात्र आपल्याला खाऊपिऊ घालणाऱ्या महिलेला विसरली नाही. जिचं तिनं खाल्लं तिचं ऋणही फेडण्याचा प्रयत्न तिनं केला.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता सुरुवातीला एक महिला हातात सामान घेऊन येताना दिसते. ती दरवाजा उघडायला जाते. तेव्हा तिला तिथं भिंतीवर एक कुकी दिसते. महिलाही विचार करते, ही कुकी आली कुठून? त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये तुम्ही पाहाल तर ती महिला येण्याआधी एक खार तिथं आलेली असते. ती आपल्यासोबत कुकी घेऊन येते आणि त्या भिंतीवर ठेवून तिथून निघून जाते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button