ताज्या बातम्या
एफआयआरमध्ये पहिलं नाव शरद पवाराचं – नामदेव जाधव
राष्ट्रावादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळं फासल्यानंतर नामदेव जाधव यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी म्हटले की, माझ्यावरील हल्ल्यासाठी मी कार्यकर्त्यांना जबाबदार धरणार नाही.
परंतु यासाठी शरद पवाराचं एफआयआरमध्ये पहिलं नाव आणि दुसरं नाव रोहित पवारांचं असणार आहे. या दोघांची आमदारकी आणि खासदारकी रद्द करण्यासाठी मी प्रचंड मोठं पाऊल उचलणार आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे.