भाजपचा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख याचा एका महिलेबरोबरील बेडरूममधील व्हिडीओ व्हायरल

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


भाजपचा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख याचा एका महिलेबरोबरील बेडरूममधील व्हिडीओ व्हायरल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. तोकडय़ा कपडय़ांत असलेल्या देशमुखने महिलेला मारहाण केल्याचे उघडकीस आल्याने सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जात असून, या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.
सांगोल्यातील भाजपचा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख याचा एका महिलेला बेडरूममध्ये मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे जिह्यात एकच खळबळ उडाली असून, देशमुख याच्यावर गुन्हा दाखल करण्याची सर्वत्र मागणी होत आहे. बेडरूममध्ये तोकडय़ा कपडय़ांत बसलेल्या श्रीकांत देशमुखवर एका महिलेने लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचे सांगत असताना चिडलेल्या देशमुखने बेदम मारहाण केल्याचे चित्रण झाले आहे. देशमुखच्या मारहाणीने महिला विव्हळत असून, या व्हिडीओमुळे महिलांनी तीव्र कारवाईची मागणी केली आहे. हा व्हिडीओ पीडित महिलेनेच व्हायरल केल्याची चर्चा आहे. या व्हिडीओमुळे भाजपच्या जिल्हाध्यक्षाचे काळे कारनामे उघड झाले आहेत. यापूर्वीही श्रीकांत देशमुखवर अनेक आरोप करण्यात आले आहेत.

दरम्यान, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशमुख याने आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तो तातडीने मंजूरही केला आहे.