ताज्या बातम्या

इतिहासात आजवर झाली नाही, अशी अजित पवारांची सभा बीडमध्ये होईल – धनंजय मुंडे


बीड – २७ तारखेची सभा कोणालाही उत्तर म्हणून नाही तर बीड जिल्ह्याच्या विकासाचे व्हिजन मांडण्यासाठी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री व वरिष्ठ नेते बीडला येणार असून इतिहासात आजवर झाली नाही, अशी सभा होईल.राष्ट्रवादीच्या रेकॉर्डब्रेक सभेच्या नियोजनाचा बीडमधून श्रीगणेशा होणार आहे. त्याचसोबत आम्ही सभेतून नाही कर्तृत्वातून उत्तर देणारी माणसं आहोत असा घणाघात मंत्री धनंजय मुंडे यांनी शरद पवार गटातील नेत्यांवर केला आहे.



 

धनंजय मुंडे म्हणाले की, येत्या २७ तारखेला बीड येथील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष खा. प्रफुल पटेल, प्रांताध्यक्ष खा. सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह मंत्रिमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व सदस्य मंत्री व मान्यवरांच्या उपस्थितीत जाहीर सभा संपन्न होणार असून, ही सभा कोणत्याही सभेचे उत्तर किंवा कुठल्याही नेत्याला उत्तर देण्यासाठी नसून आमच्या सरकारचा बीड जिल्ह्यासह राज्याच्या विकासाचा दृष्टिकोन जिल्ह्याच्या जनतेसमोर मांडण्यासाठी आहे असं त्यांनी सांगितले.

 

बीड शहरातील सनराईज हॉटेल येथे या सभेच्या नियोजनार्थ आज कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जिल्ह्याभरातून लागलेली उपस्थिती पाहुन बैठकीलाच सभेचे स्वरूप आले होते. बीड जिल्हा हा कायम दुष्काळी, मागासलेला आणि ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून गणला जातो. ही ओळख पुसून टाकण्यासाठी विकासाची दृष्टी असलेल्या अजितदादांची आम्ही साथ देत आहोत. भविष्यात ही ओळख पुसून प्रगतीचा मार्ग मोकळा करण्याचे आमचे व्हिजन असून, तेच या सभेच्या माध्यमातून मांडायचे असल्याने या सभेची व्याप्ती संपूर्ण बीड जिल्ह्यात लागू होते असेही धनंजय मुंडे म्हणाले.

 

तसेच कोणालाही उत्तर द्यायचेच असेल तर आम्ही आमच्या कामातून, कर्तृत्वातून उत्तर देऊ, सभेतून नाही असे म्हणत धनंजय मुंडेंनी १७ तारखेला झालेल्या सभेला जनताच २०२४ च्या निकालातून उत्तर देईल. बीड जिल्ह्याचा विकास, सन्मान आणि अस्मिता व दुष्काळ मिटवण्यासाठीचे व्हिजन देण्याची ही सभा असणार असल्याचे त्यांनी सांगून दादांची दृष्टी विकासाची आहे, त्यासाठीच आम्ही दादांच्या पाठीशी आहोत असंही मुंडेंनी सांगितले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button