राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेना एनडीएच्या च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार !

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


मुंबई: राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेना एनडीएच्या च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना आपला पाठिंबा देणार असल्याचं आता जवळजवळ निश्चित संजय राऊत यांनी आज (१२ जुलै) माध्यमांशी बोलताना दिले आहेत. खासदारांचा वाढता दबाव लक्षात घेता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला असल्याचं समजतं आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

याविषयीचा निर्णय उद्धव ठाकरे हे येत्या दोन दिवसात जाहीर करतील असंही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं. याच वेळी संजय राऊत असंही म्हणाले की, द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा म्हणजे भाजपला पाठिंबा नाही. तसंच उद्धव ठाकरे कोणत्याही दबावाखाली निर्णय घेत नाही. त्यांनी सगळ्या खासदारांची मतं ऐकून घेतली आहेत. त्यामुळे आता ते याबाबत निर्णय जाहीर करतील. असं संजय राऊत म्हणाले. मात्र, यावरुन एक गोष्ट जवळजवळ निश्चित झाली आहे की, खासदारांच्या दबावामुळे अखेर उद्धव ठाकरे हे एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या निर्णयाप्रत पोहचले आहेत.