महत्वाचे

सफाई कामगार ते सरपंच’, ‘मोऱ्या’ उर्फ सीताराम जेधेचा थक्क करणारा प्रवास!


‘सफाई कामगार ते सरपंच’, ‘मोऱ्या’ उर्फ सीताराम जेधेचा थक्क करणारा प्रवास!



आपण वाट्टेल तिथे फेकलेला हजारो टन कचरा, टाकलेलं – कुजलेलं अन्न, प्लास्टिक, बाटल्या, रत्यावर मारलेल्या पिचकाऱ्या, स्वयंपाकघर, प्रसाधनगृहातील सांडपाणी, फुटलेली – तुंबलेली गटारे, कुठल्याही साधनसामुग्रीशिवाय मॅनहोलखालील ड्रेनेज लाइन स्वच्छ करणाऱ्या देवदूतांपैकीच एक असणारा ‘मोऱ्या’ उर्फ सीताराम जेधे. सफाई कामगार ते पिंपळनेरचा सरपंच हा त्याचा थक्क करणारा जीवनप्रवास नेमका आहे तरी कसा हे दाखविण्यासाठी ‘मोऱ्या’ चित्रपट लवकरच सर्वांच्या भेटीस येत आहे.

‘मोऱ्या’ची कथेने युरोपमधील लंडन, मिल्टन केन्स, मेंचेस्टर, इटली इत्यादी शहरांसह अमेरिकेतील न्यूयॉर्क, रॅले, ऑक्सफर्ड (यूएसए) तसेच ऑस्ट्रेलिया, सिंगापूर अश्या देशांतील रसिकांना आकर्षित केले असून ‘मोऱ्या’ उर्फ सीताराम जेधेला भेटण्यासाठी ते विशेष उत्सुक आहेत. येत्या ५ नोव्हेंबरला मोऱ्या उर्फ सीताराम जेधेची भूमिका करणारा लेखक, दिग्दर्शक व अभिनेता जितेंद्र बर्डे लंडनला रवाना होणार आहे. वरील देशांतील प्रतिनिधींसाठी या चित्रपटाचं विशेष स्क्रीनिंग लंडनजवळच्या मिल्टन केन्स येथे आयोजित करण्यात आले आहे. या शो नंतर डिसेंबर २०२३ मध्ये जगभरातील अनेक शहरामध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.

‘मोऱ्या’चा टीझर ‘कान महोत्सवात दाखवण्यात आला होता. एलएचआयएफएफ बार्सिलोना आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, खजुराहो आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव, झारखंड आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव-२०२२, पेनझान्स आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव, अयोध्या फिल्म फेस्टिव्हल, लेक सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, बॉलिवूड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल या चित्रपट महोत्सवांत या सिनेमाला ‘उत्कृष्ट चित्रपटा’चा बहुमान मिळाला आहे. तसंच यापैकी काही महोत्सवांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट बालकलाकार, सर्वोत्कृष्ट कथा असे पुरस्कारही या सिनेमानं पटकावले आहेत. जितेंद्र बर्डेची ही पहिलीच कलाकृती आहे. या निर्मितीसाठी निर्माती तृप्ती कुलकर्णी, राजेश अहिवले, सहनिर्माते प्रेरणा धजेकर, पूनम नागपूरकर, मंदार मांडके, राहुल रोकडे, सचिन पाटील यांची खंबीर साथ लाभली आहे.

‘टॉर्टुगा मोशन पिक्चर्स’ निर्मित ‘मोऱ्या’मध्ये उमेश जगताप, संजय भदाणे, धनश्री पाटील, राहुल रोकडे, सुरज अहिवळे, रुद्रम बर्डे, कुणाल पुणेकर, शिवाजी गायकवाड, दीपक जाधव, विजय चौधरी, अविनाश पोळ, रुपाली गायके आणि जितेंद्र पुंडलिक बर्डे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.या चित्रपटात उमेश जगताप, संजय भदाणे, धनश्री पाटील, रुद्रम बर्डे, कुणाल पुणेकर आणि शीर्षक भूमिकेत जितेंद्र बर्डे यांनी काम केले आहे. हा चित्रपट लवकरच महाराष्ट्रातही प्रदर्शित होणार आहे.

प्रसिद्धी जनसंपर्क प्रमुख : राम कोंडीलकर


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button