क्राईम

आईच मुलासाठी घरात ठेवायची सेक्स पार्टी!


अमेरिकेतील कॅलिफॉर्निया येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील स्थानिक पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. ही महिला चक्क तिच्या मुलाच्या मित्रमैत्रिणींसाठी आपल्या घरात सेक्स पार्टींचं आयोजन करायची असा ठपका पोलिसांनी तिच्यावर ठेवला आहे.



या पार्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मद्यपानही केलं जायचं असा पोलिसांचा दावा आहे. ही महिला तिच्या मोबाईलवरुन “good books with young sex,” “hot 16 (year) old teenage girls” यासारख्या गोष्टी सर्च करायची असंही पोलिसांनी म्हटलं आहे. आपल्या दाव्यांचा पुरावा म्हणून पोलिसांनी या महिलेच्या मोबाईलची सर्ज हिस्ट्रीची माहिती आणि इतर कागदपत्रं कोर्टासमोर सादर केले आहेत.

लहान मुलांना ठेवायला लावायची शरीरसंबंध

शॅनन ओकॉर्नन असं या आरोपी महिलेचं नाव असून ती 49 वर्षांची आहे. या महिलेला पोलिसांनी 2021 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये अटक केली होती. अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार करणे, त्यांना मद्यपान करण्यास भाग पाडणे आणि सेक्स पार्टी आयोजित करण्याच्या आरोपाखाली तिला अटक करण्यात आली होती. सॅण्टा कॅलरा काऊंट सुपिरिअर कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली त्यामध्ये कोर्टासमोर पोलिसांनी या पार्ट्यांबद्दल आरोपी महिला कमालीची गुप्तता बाळगत होती असं म्हटलं आहे. शॅनन लहान मुलांना एकमेकांबरोबर शरीरसंबंध ठेवण्यासाठी प्रोत्साहन देत होती. ही सर्व मुलं 13 ते 16 वयोगटातील होती. कधीकधी या मुलांना ही महिला सेक्स करतानाची कृती बघायला भाग पाडायची असंही आरोप पत्रात म्हटलं आहे.

तिच्या गुलल सर्चची हिस्ट्रीही कोर्टासमोर केली सादर

शॅननने आयोजित केलेल्या या सेक्स पार्टी जून 2020 ते फेब्रुवारी 2021 दरम्यान आयोजित करण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे, असं वृत्त ‘पिपल डॉट कॉम’ने दिलं आहे. लैंगिक अत्याचाराचे शॅननविरोधातील गुन्हे सिद्ध झाले असून इतर प्रकरणांमध्ये ती निर्दोष ठरली आहे. या प्रकरणाची सविस्तर सुनावणी 6 नोव्हेंबर 2023 रोजी होणार आहे असं ‘केआरओएन 4’ ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. या आरोपपत्रामध्ये शॅननने आपल्या मोबाईल फोनवरुन गुगलवर “good books with young sex,” “hot 16 (year) old teenage girls” आणि “prettiest 16 year old girl” या सारख्या गोष्टी सर्च केल्याचं पुराव्यांसहीत सादर करण्यात आलं आहे.

अंगप्रदर्शन करणाऱ्या मुलींचे व्हिडीओ

“तिच्या मोबाईलवर टिकटॉक आणि इतर सोशल मीडिया अकाऊंटवरुन डाऊनलोड केलेले व्हिडीओ आढळून आले. या व्हिडीओमध्ये अल्पवयीन मुली दिसत आहेत. या मुलींनी अंगप्रदर्शन करणारे कपडे परिधान केले असून त्या कॅमेराकडे पाहून उत्तेजक विधानं करत आहेत,” असंही पोलिसांनी शॅननविरोधातील आरोपपत्रात नमूद केलं आहे. मात्र या व्हिडीओंमधील मुली शेनॉनला प्रत्यक्षात ओळखतात असं म्हणता येणार नाही असंही पोलिसांनी म्हटलं आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button