पुणे

दीड कोटी जिंकलेल्या पीएसआय सोमनाथ झेंडेंवर मोठी कारवाई!


पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील उपनिरीक्षकाला नशीब उजळलं पण हा आनंद जास्त वेळ टिकला नाही. पिंपरी चिंचवडमधील पीएसआय सोमनाथ झेंडे यांचे अखेर निलंबन करण्यात आलं आहे.वर्दीच्या वर्तवणुकीला बाधा पोहचवल्याचा ठपका सोमनाथ झेंडे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पण विभागीय चौकशीमध्ये त्यांना स्वतःचं म्हणणं मांडण्याची मुभा मिळणार आहे.

क्रिकेट वल्ड कपवेळी झेंडेंनी ड्रीम 11 या ऑनलाइन गेममध्ये स्वतःची टीम लावली आणि त्यांनी लाखो रूपये जिंकले. त्यामुळे झेंडे काही दिवसांपुर्वी चर्चेचा विषय ठरले. पण त्यांचा हा आनंद जास्त काळ टिकला नाही. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड पोलिसांनीच त्याची चौकशी केली आणि त्यामध्ये त्याचं निलंबन करण्यात आलं आहे. वर्दीच्या वर्तवणुकीला बाधा पोहचल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला असून पुढे विभागीय चौकशी होईल त्यात त्यांना स्वतःच म्हणणं मांडता येणार आहे.

काय आहे प्रकरण?

सोमनाथ झेंडे यांचे क्रिकेटचे प्रचंड प्रेम आहे. गेल्या काही महिन्यापासून त्यांना ड्रीम इलेव्हन ऑनलाइन गेमचे वेड लागले होते. विश्वचषकातील खेळाडूंचा अभ्यास करत ते ड्रीम इलेव्हनवर टीम तयार करत होते. बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्यावर ड्रीम इलेव्हनची टीम तयार केली आणि ती अव्वल ठरली. त्यात सोमनाथ झेंडे यांना तब्बल दीड कोटींचे बक्षीस लागले आहे. झेंडेंच्या खात्यावर पैसे येण्यास सुरूवात झाली.

दरम्यान तरूणाई अशा ऑनलाईन गेमच्या आहारी जाऊ नये, अशा ऑनलाईन गेममुळे त्यांची फसवणूक होऊ नये, म्हणून पोलिसांनी जनजागृती करणे गरजेचे आहे. मात्र, स्वतः पोलीस अधिकाऱ्यानेच गेममुळे चुकीचा संदेश दिल्याचं अनेकांकडून बोललं जातं आहे. त्यामुळे पीएसआय झेंडेना दोषी ठरवण्यात आलं आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button