भारतीय मुस्लिमांची हज यात्रेसाठी नोंदणी,गाइड हिंदीत प्रसिद्ध झाले नाही

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

दरवर्षी लाखो मुस्लिम बांधव हज यात्रेसाठी सौदी अरेबियात जातात. भारतातूनही लाखो लोक दरवर्षी हज यात्रेसाठी सौदी अरेबियात जातात. जगात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढल्याने हज यात्रेवर दोन वर्षांपासून परिणाम झाला होता.

मात्र कोरोनाचं संकट टळल्यानंतर आता हज यात्रेसाठी लाखो लोक पुन्हा जाऊ लागले आहेत. या वर्षीही लाखो भारतीय मुस्लिमांनी हज यात्रेसाठी नोंदणी केली आहे.

*हज गाइड हिंदीत नाही

या वर्षी सौदी अरेबियाने यात्रेकरुंच्या मदतीसाठी खास गाइड तयार केले आहे. या गाइडच्या मदतीने यात्रेकरुंना आवश्यक ती सर्व माहिती मिळू शकते. 14 भाषांमध्ये हे गाइड जारी करण्यात आले आहे. परंतु हे गाइड हिंदीत प्रसिद्ध झाले नाही. तर दुसरीकडे, दरवर्षी लाखो भारतीय मुस्लिम हज यात्रेसाठी सौदी अरेबियात जातात. सौदी अरेबियाने यात्रेकरुंसाठी एक अनोखा जागृती उपक्रम म्हणून हे गाइड सुरु केले आहे.

*हज यात्रेकरुंना मदत होईल

हज आणि उमराह मंत्रालयाने सुरु केलेल्या या नव्या उपक्रमाच्या माध्यमातून यंदाच्या वर्षी जनजागृती करण्यात येणार आहे. या गाइडमध्ये यात्रेशी संबंधित विविध टप्पे आणि यात्रेकरुंशी संबंधित समस्यांचा समावेश आहे. या गाइडमध्ये यात्रेकरुंना यात्रेकरुंना आवश्यक ती सर्व धार्मिक, वैद्यकीय, प्रक्रियात्मक आणि तार्किक माहिती प्रदान करणारी भाषांतरे आहेत. या उपक्रमाद्वारे, हज आणि उमराह मंत्रालयाने हज यात्रेकरुंना शक्य तितक्या उत्तम सेवा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत.

*विवीध भाषांमध्ये जारी केले गाइड

ई-गाइड अरबी, इंग्रजी, फ्रेंच, उर्दू, बंगाली, इंडोनेशियन, मलय, हौसा, अम्हारिक, पर्शियन, स्पॅनिश, तुर्की, रशियन आणि सिंहली भाषांमध्ये जारी करण्यात आले आहे. हे हज आणि उमराह यात्रेकरुंना प्रवासाच्या प्रत्येक पैलूंबद्दल आवश्यक ती मूलभूत माहिती थेट, सर्वसमावेशक पद्धतीने देते.