ताज्या बातम्या

CRPF, BSF जवानांच्या परेडला लवकरच वाजणार भारतीय धून, इंग्रज राजवटीच्या परंपरा होणार इतिहासजमा


दिल्ली: केंद्रीय राखीव पोलीस दल आणि सीम सुरक्षा दलाचे जवान लवकरच इंग्रज राजवटीपासून सुरू असलेली धून वाजवण्याऐवजी भारतीय धून वाजवून परेड करताना दिसतील.
देशातील दोन सर्वात मोठ्या अर्धसैनिक दलांनी यासोबतच पुढच्या २५ वर्षांपासाठी रोडमॅप तयार केला आहे. या अंतर्गत हळू हळू इंग्रज राजवटीची निशाणी असणाऱ्या गोष्टी हटवल्या जाणार आहेत. याचा एक भाग म्हणून बॅगपाईप, स्कॉटिश किल्टस् आणि बिगुल हटवण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच अर्दली म्हणून सुरक्षा सहायकांची नियुक्तीही संपुष्टात आणली जाणार आहे.



सीआरपीएफ आणि बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी स्वातंत्र्य दिनी भाषणावेळी ‘पंचप्राण’ची घोषणा केली होती. त्यानुसार सुरक्षा दलांमध्ये बदल करण्यासाठी त्यांच्या कामात आणि परंपरांमध्ये बदल केले जात आहेत. दोन दलांनी पुढच्या एक, तीन ,पाच, 15 आणि 25 वर्षांसाठी योजना तयार केल्या आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, आम्ही गुलामी आणि वसाहतवादी मानसिकतेच्या खुणा हटवण्याच्या योजना तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय वर्दीसोबत मार्चिंग बँडवेळी घालण्यात येणारे स्कॉटिश किल्ट्स बदलले जातील. सीआरपीएफ एक वर्षात हे बदल लागू करणार आहे. तर बीएसएफने यासाठी पुढच्या १० वर्षांचे लक्ष्य ठेवले आहे. सीआरपीएफ पुढच्या २५ वर्षात सर्व वस्तू, उपकऱणे आणि वाहनांना मेक इन इंडिया उत्पादनांनी बदलणार आहे. बीएसएफच्या एका अधिकाऱ्याने म्हटलं की, दलाला घरेलू कामात मदतीसाठी सुरक्षा सहाय्यकांना घेण्याची परंपरा पुढच्या वर्षी संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षा दलांमध्ये पुढच्या तीन वर्षात शारीरिक श्रम कमी करण्यासाठी रोबोट आणण्याचा निर्णयही घेतला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button