ताज्या बातम्या

आंबेडकरी विचार मोर्चाच्या मराठवाडा सचिव पदी सय्यद सलीम बापू


आंबेडकरी विचार मोर्चाच्या मराठवाडा सचिव पदी सय्यद सलीम बापू



माजलगाव / प्रतिनिधी
यथील सुप्रसिद्ध समाजसेवक तथा माजी नगरसेवक सय्यद सलीम बापू यांची आंबेडकरी विचार मोर्चाच्या मराठवाडा सचिव पदी निवड करण्यात आली आहे.
असे की,सतत बौध्द, दलित, आदिवासी, मागासवर्गीय,भटक्या विमुक्त,अल्पसंख्याक समाजाच्या सामाजिक,शैक्षणिक,आर्थिक प्रश्नासाठी व अन्याय अत्याच्याराच्या विरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे तसेच फुले,शाहु,आंबेडकरी विचाराकरीता अग्रेसर राहुल समाजाचे विविध प्रश्न मार्गी लावणारे माजलगाव येथील सुप्रसिद्ध समाजसेवक तथा माजी नगरसेवक सय्यद सलीम बाबू यांची निवड “आंबेडकरी विचार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा संस्थापक अध्यक्ष मा.नारायण बागडे सर यांच्या आदेशानुसार आंबेडकरी विचार मोर्चाचे मराठवाडा अध्यक्ष कल्याण देहाडे यांनी नियुक्तीपत्र देऊन सय्यद सलीम बापू यांची आंबेडकर विचार मोर्चाच्या मराठवाडा सचिव पदी निवड केली आहे.
यावेळी शेख इलियास,शेख बाबा,एड.सय्यद अल्ताफ,सय्यद समीर,शेख वसीम आदींनी उपस्थित राहून सय्यद सलीम बापू यांना शुभेच्छा देत पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button