क्राईमताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं सांगून रुग्णालयाने केले अंत्यसंस्कार; 2 वर्षांनी ‘तो’ परतला मग काय?


कोरोनाच्या काळात बडोद्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान डॉक्टरांनी 40 वर्षीय व्यक्तीला मृत घोषित करून तेथेच त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. पण आता दोन वर्षांनंतर मृतक अचानक जिवंत घरी परतल्याने नातेवाईकांना धक्का बसला आहे.



याच दरम्यान त्याला एका टोळीने ओलीस ठेवून अत्याचार केल्याची चर्चा रंगली आहे. संधी मिळताच त्याने चोरट्यांच्या तावडीतून पळ काढला आणि शुक्रवारी रात्री जिल्ह्यातील सरदारपूर तालुक्यात आपल्या मामाचं घर गाठलं. तेथील पोलिसांना माहिती दिली. आता कानवन पोलीस ठाण्यात आणण्यात येत आहे.

2021 मध्ये कमलेशला कोरोना झाला होता. कोरोनाच्या उपचारासाठी बडोदा येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचारादरम्यान डॉक्टरांनी कमलेशला मृत घोषित केले. रुग्णालयाची माहिती मिळताच नातेवाईक रुग्णालयात पोहोचले. मात्र कोरोना पॉझिटिव्ह असल्याने मृतदेह दुरूनच नातेवाईकांना दाखवण्यात आला. पॉलिथिनमध्ये गुंडाळलेल्या मृतदेहाची खात्रीशीर ओळख पटवणे शक्य नव्हते. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने नातेवाईकांनी कमलेश म्हणून स्वीकारले. मृत्यू झाल्याने कोविड टीमने मृतदेह नातेवाईकांना न देता बडोद्यातच अंत्यसंस्कार केले.

रूग्णालय व्यवस्थापनाच्या नोंदीनुसार, मृत समजून नातेवाईकांनी घरी शोक व्यक्त केला आणि विधीही केले. कमलेशची पत्नीही दोन वर्षे विधवेचे जीवन जगत होती. पण कमलेश जिवंत असल्याने ती आता आनंदी आहे. वडील आणि नातेवाईकांना पाहून कमलेशही भावूक झाला. सरदारपूर पोलीस ठाण्यात त्याच्या जिवंत असल्याची अधिकृत प्रक्रिया पूर्ण करण्याची माहिती देण्यात आली.

कोरोनामधून बरे झाल्यानंतर कमलेशने अहमदाबादमधील एका टोळीच्या तावडीत असल्याची माहिती दिली. त्याने सांगितले की अहमदाबादमध्ये पाच ते सात तरुणांनी त्याला ओलीस ठेवले होते. औषधांचे इंजेक्शन देण्यात आले, ज्यामुळे तो सर्व वेळ बेशुद्ध राहिला. शुक्रवारी अहमदाबादहून गाडीतून अन्यत्र नेत असताना टोळीचे सदस्य एका हॉटेलमध्ये अल्पोपहारासाठी थांबले. दरम्यान, अहमदाबादहून इंदूरकडे प्रवासी बस येत असल्याचे पाहून तो गाडीतून खाली उतरून बसमध्ये बसला आणि मामाच्या घरी पोहोचला. एका वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button