ताज्या बातम्याबीडमहत्वाचेमहाराष्ट्र

अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या बीड जिल्हा सचिव विजय सिताराम पोकळे यांची निवड


अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या बीड जिल्हा सचिव विजय सिताराम पोकळे यांची निवडबीड (प्रतिनिधी) :- भारतभर पत्रकार बांधवांच्या सुरक्षेसाठी कार्य करणारी अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या बीड जिल्हा सचिव पदी विजय सिताराम पोकळे यांची निवड करण्यात आली आहे.
असे की येथील ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते विजय सिताराम पोकळे यांची अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या बीड जिल्हा सचिव पदी निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीचे सर्व पदाधिकारी सदस्य कार्यकर्त्यांनी राज्य कार्यकारणीकडे पाठविलेल्या प्रस्तावानुसार अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलशाद एस.खान यांनी एका नियुक्तीपत्रातून विजय सिताराम पोकळे यांची बीड जिल्हा सचिव पदी सर्वानुमते निवड केली आहे.
विजय दादा पोकळे यांच्या निवडीबद्दल जिल्हाभरातील पत्रकार बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण असून यानिमित्त अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीचे बीड जिल्हाध्यक्ष पठाण अमरजान,भागवत वैद्य,शेख अझर भाई, सय्यद मिनाजोद्दीन,किशोर सोनवणे,रोहित धुरांदरे,संजय देवा कुलकर्णी आदींनी शुभेच्छा देत पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या.

लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button