क्राईमताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

तो पळत होता अन् त्याच्या मागे तिघे चाकू-कोयते घेऊन धावत होती,विद्यार्थ्याचा निर्घृणपणे खून


सांगली : सांगली शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगली शहरामध्ये अंगावर थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. सांगली शहरात भर रहदारीच्या ठिकाणी थरारक सिनेस्टाईल पाठलाग करत एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. माधवनगर रस्त्यावरील वसंतदादा साखर कारखान्याच्या परिसरामध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे.



लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !

काल गुरुवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. राजवर्धन राम पाटील, वय 18 असे या मृत विद्यार्थ्याचं नाव आहे. तो वसंतदादा औद्योगिक परिसरातील शासकीय आयटीआयमध्ये शिकत होता. या घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत तपास सुरू केला आहे.

मात्र, हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला, हे स्पष्ट होऊ शकले नाही. सायंकाळी सहाच्या सुमारास वसंतदादा साखर कारखान्याच्या गेट समोर राजवर्धन पाटील हा पळत होता आणि त्याच्या मागे तीन ते चार तरुण हातामध्ये चाकू आणि कोयता घेऊन पाठलाग करत होते. कारखाना गेटच्या हद्दीत या हल्लेखोरांनी राजवर्धनला गाठले आणि त्याच्यावर कोयता आणि चाकूने वार करत त्याचा निर्घृण खून केला आहे. राजवर्धन राम पाटील हा वसंतदादा औद्योगिक एरियातील शासकीय आयटीआयमध्ये शिकत होता.

तो मूळचा तासगाव तालुक्यातील मतकुणकी या गावचा होता. पण तो बुधगाव या ठिकाणी राहत होता. सायंकाळी वसंतदादा कारखाना परिसरात तो आला असता यावेळी हल्लेखार तरुण आणि राजवर्धन यांच्यामध्ये वादावादी घडली आणि त्यानंतर थरारक पाठलाग करत त्याचा खुन करण्यात आला. ज्या तरुणांनी हा हल्ला करत खून केला ते हल्लेखार तरुण कोण होते, कोणत्या कारणातून ही हत्या करण्यात आली?

हे स्पष्ट होऊ शकले नाही. घटनेची नोंद संजयनगर पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे. तसेस अधिक तपास संजयनगर पोलीस करत आहेत.

लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button