ताज्या बातम्यापुणेमहत्वाचेमहाराष्ट्रराजकीय

वसंत मोरे राष्ट्रवादीत प्रवेश करणार?


पुणे : पुण्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे मागील काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा सुरू होती. मनसेच्या विविध कार्यक्रमांतून वसंत मोरे यांना डावलण्यात येत असल्याचेही समोर आले आहे. याबाबत वसंत मोरे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. यानंतर आता वसंत मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबरोबर एकाच कारमधून प्रवास केला आहे. त्यामुळे वसंत मोरे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.



काल (बुधवारी) मनसे नेते वसंत मोरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एकाच कारमधून प्रवास केला. दोन्ही नेत्यांनी पुण्यातील कात्रज चौकातील पुलाच्या कामाची पाहणी केली. दरम्यान, दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ चर्चा झाल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे वसंत मोरे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशा चर्चांना आता उधाण आले आहे.

कात्रज चौकातील पुलाच्या कामाची पाहणी झाल्यानंतर सुप्रिया सुळेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. बोलताना त्या म्हणाल्या की, वसंत मोरे आणि आमचा मागील १३ वर्षांचा प्रवास आहे. आम्ही समन्वयाने काम करतो, असे त्या म्हणाल्या.

विकासाच्या कामात मतभेद नाहीत : सुळे
मोरेंसमवेत एकाच वाहनातून प्रवास केल्याबद्दल विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘‘गेल्या १३ वर्षांचा हा प्रवास आहे. माझे म्हणणे असे आहे की, एकदा निवडणूक झाली की विकासाच्या कामात आमचे काहीच मतभेद नाहीत. आम्ही समन्वयाने काम करतो. गेल्या १३ वर्षांमध्ये मला वसंत मोरे यांची मदतच झाली असेल, कदाचित माझाच त्यांना त्रास झाला असेल. याहून जास्त काही सांगू शकत नाही’’ असेही पुढे त्या म्हणाल्या.

लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button