ताज्या बातम्याबीडमहत्वाचेमहाराष्ट्र

सीसीटीएनएस प्रणालीत बीड पोलीस राज्यात अव्वल..


बीड : केंद्र शासनाच्या सीसीटीएनएस (CCTNS) या प्रणालीत काम करण्यात फेब्रुवारी महिन्याची रँकिंग जाहीर झाली असून, यामध्ये बीड जिल्हा (Beed District) राज्यात अव्वल ठरला आहे. क्राईम अँड क्रिमिनल ट्रेकिंग नेटवर्क सिस्टीम प्रणाली पोलीस दलात तयार करण्यात आलेली आहे. या प्रणालीद्वारे पोलीस ठाण्याच्या अंतर्गत कामकाज ऑनलाईन पद्धतीने चालते. तसेच सिटीजन पोर्टलद्वारे नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. दरम्यान याच प्रणालीमध्ये बीड जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.त्यामुळे बीड पोलिसांचे (Beed Police) सर्वत्र कौतुक होत आहे.

केंद्र शासनाच्या अत्यंत महत्त्वाच्या ई-गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत नेशन क्राईम ब्युरोने क्राईम अँड क्रिमिनल ट्रेकिंग नेटवर्क अँड सिस्टम विकसित करण्यात आली आहे. दरम्यान सीसीटीएनएस प्रणालीअंतर्गत राज्यातील सर्वच ठाण्याचे कामकाज संगणकीकृत आणि ऑनलाईन पद्धतीने चालते. तर फेब्रुवारी 2023 च्या मूल्यांकनात बीड जिल्ह्याने बाजी मारली आहे. बीड पोलिसांना 342 पैकी 335 गुण प्राप्त झाले असून, त्यांना राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.

बीड पोलिसांचे सर्वत्र कौतुक

गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुणे येथील राज्याचे अपर पोलिस महासंचालक कार्यालयाकडून सीसीटीएनएस प्रणालीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातील एकूण 53 घटकांच्या मासिक कामगिरीचे मूल्यांकन करुन उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या घटकांची क्रमवारी जाहीर केली जाते. नुकतीच फेब्रुवारी महिन्याचे आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. ज्यात राज्यात बीड पोलीस अव्वल ठरले आहेत. केंद्र शासनाच्या सीसीटीएनएस या प्रणालीत बीड पोलिसांना 342 पैकी 335 गुण प्राप्त झाले. त्यामुळे बीड पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र आता हाच नंबर कायम ठेवण्याचे आव्हान देखील बीड पोलिसांसमोर असणार आहे.

यांनी घेतले परिश्रम…

केंद्रशासनाच्या सीसीटीएनएस या प्रणालीत राज्यात बीड पोलीस अव्वल ठरले असून, यात अनेक पोलीस अधिकाऱ्यांचे योगदान आहे. बीडचे पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अपर अधीक्षक सचिन पाटकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ, सीसीटीएनएस विभागाचे बीडचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे, अंमलदार पोना. नीलेश ठाकूर, मच्छिंद्र बीडकर, चंद्रसेन राऊत यांनी विशेष परिश्रम घेत वेळोवेळी कामकाज अद्ययावत करण्यासाठी विशेष मोहीम राबवली. यासाठी पोलीस ठाण्यांचे सीसीटीएनएस नोडल अंमलदारांनी प्रतिसाद देत अथक परिश्रम घेतले आणि आज राज्यात बीड पोलीस अव्वल ठरले.

लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button