बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान कधीही सहन करणार नाही – तिवारी

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


नागपूर : बाबरी मशीद पाडण्यात बाळासाहेबांची भूमिका नव्हती, असे विधान करणारे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ संपर्कप्रमुख आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाकरे गटाचे शहरप्रमुख नितीन तिवारी यांच्या नेतृत्वात आज (दि.१२) मोर्चा काढला.
कळमन्यातील चिखली चौक परिसरात जोरदार घोषणाबाजी करीत तीव्र आंदोलन केले.
आंदोलनादरम्यान संतप्त कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. भाजप तेरी तानाशाही नही, चलेगी अशा घोषणा देत आपला संताप व्यक्त केला,

यावेळी तिवारी म्हणाले की, दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान कधीही सहन करणार नाही.भाजपच्या सुनियोजित षडयंत्राचा भाग म्हणून बाळासाहेबांचा अवमान करण्याचा हा डाव आहे. बाळासाहेबांच्या नावावर गद्दारी करून सत्ता मिळवणारे चंद्रकांत पाटील यांच्या या विधानावर मुख्यमंत्री शिंदे राजीनामा का मागत नाहीत, असा सवालही केला. मुख्यमंत्री राजीनामा देण्याची हिंमत दाखवतील का ? तसेच उपमुख्यमंत्री फडणवीस मंत्री पाटील यांचा राजीनामा घेतील का ? असा सवालही त्यांनी केला.

यावेळी जिल्हा युवा अधिकारी प्रीतम कापसे, सचिन मुन्ना तिवारी, नाना झोडे, सुरेखा खोब्रागडे, मंगला गवरे, नीलिमा शास्त्री, अंजू गुप्ता, आशा इंगळे, रंजना राजबांडे, विभागप्रमुख अंगद हिरोंडे, हरीश रामटेके, अंकुश भोवते, शिवशंकर मिश्रा, विष्णू पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !