सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर अत्याचार, शिक्षकाला अटक

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


नागपूर : सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर अत्याचार करणाऱ्या नराधम शिक्षकाला नागपूर पोलिसांनी अटक केलीय. आरोपी शिक्षक डिसेंबर 2022 पासून या विद्यार्थीनीचे लैंगिक शोषण करीत होता.

इयत्ता सहावीत शिकणाऱ्या 12 वर्षीय बालिकेने तिच्या आईकडे पोट दुखत असल्याची तक्रार एक-दोन वेळा केली होती. गेल्या 5 एप्रिल रोजी घरी आल्यावर तिने शाळेतील गणिताचे शिक्षक संजय विठ्ठल पांडे यांचे नाव सांगितले. पांडे पीडित मुलीला पेपर सुटल्यावर प्रयोग शाळेत नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत होते असे मुलीने आईला सांगितले. आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता पांडे याने लग्न करणार असल्याचे सांगून वारंवार संबंध ठेवल्याचे सांगितले. याशिवाय ही गोष्ट कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याचीही धमकी दिली. मुलीच्या आईने सक्करदरा पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केल्यानंतर कलम 376 (एबी), 276 (2) (फ), 376 (2) (एन) तसेच पोक्सो कायद्या नुसार गुन्हा दाखल करून आरोपी शिक्षक संजय पांडे याला अटक केली आहे.सक्करदरा पोलिस ठाण्याचे ठाणेदार धनंजय पाटील यांनी आरोपी शिक्षकाला 15 एप्रिलपर्यत पोलिस कोठडी मिळाल्याचे सांगितले. या प्रकरणी मुलीच्या आईने 11 तारखेला तक्रार देताच शिक्षक संजय पांडे याला लागलीच ठाण्यात आणण्यात आले. दिवसभर चौकशी करून सायंकाळी 7.30 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर लगेच अटक करण्यात आले आहे