नागपूर पोलिसांना बॉम्बने उडवण्याची धमकी..

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


नागपूर : नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अज्ञात व्यक्तीनं 112 क्रमांकावर फोन करून पोलिसांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे. या धमकीमुळे एकच खळबळ उडाली आहे.

यापूर्वी राजकीय व्हीआयपींना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता पोलिसांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्यानं नागपूरची वाटचाल क्राईम कॅपिटलकडे होत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान हा धमकीचा फोन कोणी केला याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

धमकीच्या फोनने खळबळ घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नागपुरात थेट पोलिसांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा फोन आला आहे. अज्ञात व्यक्तीनं नागपुरातील यशोधरा पोलीस ठाण्यातील पोलिसांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे. 112 क्रमांकावर फोन करून अज्ञात व्यक्तीनं बिट मार्शला पोलिसांना बॉम्बने उडवणार असल्याच्या धमकीचा फोन केला आहे. या फोनमुळे शहरात खळबळ उडाली आहे.